Sooper News
Hot News

फुटओव्हर ब्रिजवरुन थेट रेल्वे रुळावर उडी, RPF जवानाने जीवाची बाजी लावून वाचवलं, धडकी भरवणारा VIDEO

फुटओव्हर ब्रिजवरुन थेट रेल्वे रुळावर उडी, RPF जवानाने जीवाची बाजी लावून वाचवलं, धडकी भरवणारा VIDEO

Authored by नुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 25 Feb 2024, 3:31 pm

Mumbai News: एका तरुणाने भाईंदर येथील रेल्वे पुलावरुन थेट रेल्वे रुळावर उडी घेतली. हे पाहून तिथे उपस्थित आरपीएफ जवानाने आपल्या जीवाची बाजी लावून तरुणाला वाचवलं.

man jumps from bridge

मुंबई: मुंबई जवळील भाईंदर रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणाने अचानक रेल्वे रुळावरील पुलावरुन थेट रेल्वे रुळावर उडी घेतली. या धडकी भरवणाऱ्या घटनेदरम्यान रेल्वे सुरक्षा दल आणि इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत त्या तरुणाला रेल्वे रुळावरुन बाजुला केलं आणि त्याचा जीव वाचवला. वरुन उडी घेतल्याने हा तरुण जखमी झाला होता, त्याला सध्या रुग्णालयता दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणाची माहिती तरुणाच्या नातेवाइकांना देण्यात आली आहे.

मुंबईच्या भाईंदर रेल्वे स्थानकावरील फुट ओव्हर पुलावरील आहे. येथे हा तरुण या पुलावर चढला, त्यानंतर त्याने थेट रेल्वे रुळावर उडी घेतली. ट्रॅकवर पडताच तो वेदनेने विव्हळत होता. तेव्हा समोर रेल्वे सुरक्षा दलाचे काही अधिकारी आणि काही यात्री उपस्थित होते.

तरुणाला रेल्वे रुळावर पाहून जवानांनी त्याच्याकडे धाव घेतली. त्यानंतर त्याला उचलून बाजुला केले. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. भाईंदर पूर्व-पश्चिमला जोडणारा एफओबीवरुन उडी घेतलेल्या या तरुणाचा व्हिडिओही समोर आला आहे. पश्चिम रेल्वेने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच, रेल्वेचे सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही दिला आहे.

रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा तरुण रेल्वे रुळावर पडला तेव्हा तात्काळ आरपीएफ आणि काही लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्याला बाजुला केले त्यामुळे त्याचा जीव वाचला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आली आहे. त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला याचं कारण सध्या कळू शकलेलं नाही.

नुपूर उप्पल यांच्याविषयी

नुपूर उप्पल

नुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… Read More

Read More

Related posts

Paytm COO Bhavesh Gupta quits; company rejigs senior management

ravik1910
8 months ago

4-Year-Old Accidently Breaks 3,500-Year-Old Jar in Israel’s Hecht Museum | Republic World

ravik1910
4 months ago

Madhya Pradesh CM keeps home; deputy CMs get finance, health

ravik1910
12 months ago
Exit mobile version