Sooper News
Hot News

रामटेकमधील महाविकास आघाडीचा तिढा सुटला; सुरेश साखरेंचा उमेदवारी अर्ज मागे

रामटेकमधील महाविकास आघाडीचा तिढा सुटला; सुरेश साखरेंचा उमेदवारी अर्ज मागे

रामटेकमधील महाविकास आघाडीचा तिढा सुटला; सुरेश साखरेंचा उमेदवारी अर्ज मागे

| Edited by वृषाल करमरकर | Lipi | 30 Mar 2024, 10:24 pm

Ramtek Lok Sabha News: रामटेक लोकसभेसाठी सुरेश साखरेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यामुळे महाविकास आघाडीला दिलासा मिळाला आहे.

हायलाइट्स:

  • सुरेश साखरे यांनी उमेदवारी मागे घेतला
  • रामटेक लोकसभा मतदारसंघाबाबत तिढा सुटला
  • माविआच्या वरिष्ठ नेत्यांच्या विनंती केल्याने अर्ज मागे
Suresh Sakhare

नागपूर: महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार श्याम बर्वे यांच्या विरोधात बंड पुकारत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुरेश साखरे यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे महाविकास आघाडीत मोठी अडचण निर्माण झाली. मात्र, माविआच्या वरिष्ठ नेत्यांच्या विनंती केल्याने सुरेश साखरे यांनी आता उमेदवारी मागे घेतला.
एकनाथ शिंदे गटाकडून निवडणूक आचारसंहितेचा मोठा भंग, जितेंद्र आव्हांडांचे वक्तव्य
दरम्यान, रामटेकची निवडणूक काँग्रेसने गांभीर्याने घेतली नाही. रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र बनावट असल्याची काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना होती. तरीदेखील त्यांना उमेदवारी का दिली, असा सवाल सुरेश साखरे यांनी केला होता. याशिवाय काँग्रेसकडे विजयी होऊ शकणारे अनेक उमेदवार होते. पण रश्मी बर्वे यांनाच उमेदवार करण्याचा आग्रह धरला. त्यामुळे रामटेक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी अडचणीत येईल. दरम्यान, रामटेक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार श्याम बर्वे यांच्या विरोधात सुरेश साखरे यांनी उमेदवारी दाखल केली होती.

१५ लाख जमा झाले का? तुमचा विश्वासघात होतोय; प्रणिती शिंदेंचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे माविआच्या नेत्यांनी सुरेश साखरे यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी राजी केले. यावर प्रतिक्रिया देताना सुरेश साखरे म्हणाले की, पक्षश्रेष्ठींनी मला फोन करून सांगितले रामटेक लोकसभामध्ये तुम्ही उमेदवारी अर्ज दिलेला आहे. त्यामुळे संपूर्ण महाविकास आघाडीमध्ये त्यामुळे अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घ्या आणि पक्षश्रेष्ठींचा मान ठेवत आपलं उमेदवारी अर्ज आज परत घेतला आहे. आतापर्यंत रामटेक लोकसभेमध्ये काँग्रेसच्या श्रेष्ठ नेत्यांनी आणि उमेदवारांनी मला प्रचारासाठी साठी या, अशा कोणत्याही सूचना मला दिली नाही. जर प्रचारासाठी बोलावतील तर मी नक्कीच जाईल. मात्र “बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना” अशा मनाप्रमाणे होत असेल तर मी जाणार नाही, असं ते म्हणाले.

हेही वाचा

महत्वाचे लेख

Read More

Related posts

Char Dham Yatra 2024: Dates announced and registration details

ravik1910
9 months ago

Galaxy S24 Ultra’s Snapdragon 8 Gen 3 for Galaxy to feature 3.4 GHz prime core

ravik1910
1 year ago

Chandrayaan-3 lander, rover sleep forever? Ex-ISRO chief says ‘no hope of reviving’

ravik1910
1 year ago
Exit mobile version