नवी दिल्ली : रोहित शर्मा आयपीएलनंतर आता भारताच्या संघात दाखल झाला आहे. भारतीय संघाबरोबर टी-२० वर्ल्ड कपसाठी तो जोरदार तयारी करत आहे. पण त्याचवेळी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने रोहित शर्माबाबत भविष्यवाणी केली आहे. यावेळी रोहित शर्मा कधी संघात दिसणार नाही, याबाबत आकाश चोप्राने आपले मत व्यक्त केले आहे.

आकाश चोप्रा हा समालोचन करत असताना बऱ्याच भविष्यवाणी करत असतो. आयपीएलच्या दरम्यान तर त्याच्या भविष्यवाणी चांगल्या गाजल्या होत्या आणि त्या खऱ्याही ठरल्या होत्या. आकाश चोप्राने हार्दिक पंड्याबाबत भविष्यवाणी केली होती, जी खरी ठरली होती. त्यानंतर आता आकाश चोप्राने रोहित शर्माबाबत भविष्यवाणी केली आहे. ही भविष्यवाणी आता खरी ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

आकाश चोप्राने सांगितले आहे की, ” सध्याच्या घडीला रोहित शर्मा भारतीय संघाबरोबर आहे. पण त्याच्यासाठी पुढचा काळ चांगला असेल, असे मला वाटत नाही. ही गोष्ट मी आयपीएलबद्दल करत आहे. रोहितने या हंगामात दमदार कामगिरी केली. पण यावर्षी रोहितला कर्णधारपदावरून काढण्यात आले. माझ्यामते मुंबई इंडियन्सचा संघ त्याला पुढच्या वर्षी आपल्या ताफ्यात कायम ठेवेल, असे मला वाटत नाही. कदाचित मी चुकीचाही ठरू शकतो. पण मुंबई इंडियन्स पुढच्या वर्षी रोहित शर्माला आपल्या संघात कायम ठेवणार नाही, असे मला वाटते. मुंबई इंडियन्सचा संघ जेव्हा पुढच्या वर्षी मैदानात उतरेल तेव्हा रोहित शर्मा हा संघाबाहेर असेल.”

आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, ” मुंबई इंडियन्सने ईशान किशनसाठी १५.५ कोटी रुपये मोजले होते. पण त्यालाही मुंबईचा संघ कायम ठेवेल, असे मला वाटत नाही. कदाचित त्याला संघात घेतले जाईल, पण एवढी रक्कम त्याच्यासाठी ते मोजणार नाहीत, असे मला वाटते. त्यामुळे आता पुढच्या वर्षी मुंबई इंडियन्सच्या संघात आपल्याला मोठे बदल पाहायला मिळू शकतात.”

मुंबई इंडियन्स हा यंदाच्या मोसमात सर्व प्रथम स्पर्धेबाहेर पडला होता. हार्दिक पंड्या हा कर्णधार आणि खेळाडू म्हणूनही अपयशी ठरला होता. पण तरीही त्याच्यावर मुंबई इंडियन्सचा संघ त्याच्यावर विश्वास कायम ठेवेल.

प्रसाद लाड

लेखकाबद्दल

प्रसाद लाड

प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.… आणखी वाचा

Read More