Sooper News
Hot News

पैकीच्या पैकी मार्क पाहिजेत तर मला काय देशील? विद्यार्थिनीकडे भलतीच मागणी, ‘रयत’च्या प्राध्यापकाविरूद्ध गुन्हा

पैकीच्या पैकी मार्क पाहिजेत तर मला काय देशील? विद्यार्थिनीकडे भलतीच मागणी, ‘रयत’च्या प्राध्यापकाविरूद्ध गुन्हा

पैकीच्या पैकी मार्क पाहिजेत तर मला काय देशील? विद्यार्थिनीकडे भलतीच मागणी, ‘रयत’च्या प्राध्यापकाविरूद्ध गुन्हा

Authored by विजयसिंह होलम | Reported by प्रियांका पाटील शेळके | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 10 Feb 2024, 11:33 am

Ahmednagar News: प्रात्यक्षिक परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क पाहिजे असतील तर मला काय देशील? असे विचारत बारावीतील विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली. या प्रकरणी रयत शिक्षण संस्थेच्या प्राध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हायलाइट्स:

  • पैकीच्या पैकी मार्क देण्यासाठी शरीर सुखाची मागणी
  • रयत शिक्षण संस्थेच्या प्राध्यापकाविरोधात गुन्हा दाखल
  • अहमदनगरमधील राधाबाई काळे महाविद्यालयातील प्रकार
Ahmednagar Crime
गुन्हा दाखल झालेला प्राध्यापक- सतीश शिर्के
अहमदनगर : बारावीच्या भूगोल विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षेत २० पैकी २० गुण देण्यासाठी प्राध्यापकाने विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी केल्याच्या आरोपावरून रयत शिक्षण संस्थेच्या नगरमधील राधाबाई काळे महिला महाविद्यालयातील प्राध्यापकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश शिर्के असे त्या प्राध्यापकाचे नाव आहे. सध्या बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहेत. त्या दरम्यान हा प्रकार झाला. त्या विद्यार्थिनीने मागणीकडे दुर्लक्ष केल्याने प्राध्यापकाने तिला प्रात्यक्षिक परीक्षेत शून्य गुण दिल्याचे आणि त्यासंबंधी विचारणा करण्यासाठी गेल्यावर पुन्हा तशीच मागणी करीत अश्लील हावभाव केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

शहरात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने नगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात ही फिर्याद दिली आहे. ती तारकपूर भागातील राधाबाई काळे महिला महाविद्यालयात बारावी कला शाखेत शिकत आहे. सध्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहे. प्रा. शिर्के भूगोलाचे शिक्षक आहेत. तिने फिर्यादित म्हटले आहे की ५ फेब्रुवारीला प्रा. शिर्के यांनी मला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावून घेतले. तुला भूगोलाच्या प्रात्यक्षिक परिक्षेत २० पैकी २० गुण हवे असतील तर मला काय देशील? अशी विचारणा केली. तेव्हा मी विषय टाळून तेथून निघून गेले. त्यानंतर महाविद्यालयाच्या आवारात भेटल्यानंतरही प्रा. शिर्के तशीच मागणी करीत राहिले. मात्र, मी त्याकडे दुर्लक्ष केले. शेवटी मला प्रात्यक्षिक परीक्षेत त्यांनी शून्य गुण दिले. त्यामुळे ८ फेब्रुवारीला मी त्यांना त्यासंबंधी विचारण्यासाठी गेले. तेव्हा त्यांनी अश्लील हावभाव करीत पुन्हा तशीच मागणी केली. माझे लैंगिक शोषण करण्याचा त्यांचा हेतून ओळखून मी तेथून निघून गेले. मी घाबरलेले असल्याने व बदनामी होईल म्हणून त्या दिवशी घरी कोणालाच काही सांगितले नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी आई-वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यांनी धीर दिला आणि आम्ही पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात सतीश शिर्के यांच्याविरूद्ध विनयभंग तसेच बालकांचे लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

विजयसिंह होलम यांच्याविषयी

हेही वाचा

महत्वाचे लेख

Read More

Related posts

Domestic hotel industry estimated to contribute $1 trillion to India’s …

ravik1910
1 year ago

Amid cheers, Uttarakhand women break glass ceiling with cricket bats

ravik1910
11 months ago

Harris at 48%, Trump at 47% in latest CNN/SSRS poll

ravik1910
3 months ago
Exit mobile version