पैकीच्या पैकी मार्क पाहिजेत तर मला काय देशील? विद्यार्थिनीकडे भलतीच मागणी, ‘रयत’च्या प्राध्यापकाविरूद्ध गुन्हा
Authored by विजयसिंह होलम | Reported by प्रियांका पाटील शेळके | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 10 Feb 2024, 11:33 am
Ahmednagar News: प्रात्यक्षिक परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क पाहिजे असतील तर मला काय देशील? असे विचारत बारावीतील विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली. या प्रकरणी रयत शिक्षण संस्थेच्या प्राध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हायलाइट्स:
- पैकीच्या पैकी मार्क देण्यासाठी शरीर सुखाची मागणी
- रयत शिक्षण संस्थेच्या प्राध्यापकाविरोधात गुन्हा दाखल
- अहमदनगरमधील राधाबाई काळे महाविद्यालयातील प्रकार
शहरात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने नगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात ही फिर्याद दिली आहे. ती तारकपूर भागातील राधाबाई काळे महिला महाविद्यालयात बारावी कला शाखेत शिकत आहे. सध्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहे. प्रा. शिर्के भूगोलाचे शिक्षक आहेत. तिने फिर्यादित म्हटले आहे की ५ फेब्रुवारीला प्रा. शिर्के यांनी मला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावून घेतले. तुला भूगोलाच्या प्रात्यक्षिक परिक्षेत २० पैकी २० गुण हवे असतील तर मला काय देशील? अशी विचारणा केली. तेव्हा मी विषय टाळून तेथून निघून गेले. त्यानंतर महाविद्यालयाच्या आवारात भेटल्यानंतरही प्रा. शिर्के तशीच मागणी करीत राहिले. मात्र, मी त्याकडे दुर्लक्ष केले. शेवटी मला प्रात्यक्षिक परीक्षेत त्यांनी शून्य गुण दिले. त्यामुळे ८ फेब्रुवारीला मी त्यांना त्यासंबंधी विचारण्यासाठी गेले. तेव्हा त्यांनी अश्लील हावभाव करीत पुन्हा तशीच मागणी केली. माझे लैंगिक शोषण करण्याचा त्यांचा हेतून ओळखून मी तेथून निघून गेले. मी घाबरलेले असल्याने व बदनामी होईल म्हणून त्या दिवशी घरी कोणालाच काही सांगितले नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी आई-वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यांनी धीर दिला आणि आम्ही पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात सतीश शिर्के यांच्याविरूद्ध विनयभंग तसेच बालकांचे लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
विजयसिंह होलम यांच्याविषयी
हेही वाचा
- नाशिकमुलींच्या शिक्षणाबाबत शिंदे सरकारचा मोठा निर्णय, चंद्रकांत पाटील माहिती देताना म्हणाले…
- सेलच्या शेवटच्या दिवशी सर्वोत्तम डील – 7,199/- रुपयांपासून स्मार्ट टीव्ही मिळवा
- प्रॉपर्टीReal Estate: घर खरेदीदारांना दिलासा, बिल्डर दिवाळखोर झाला तरी ग्राहकांचे सहजपणे मिळणार पैसे
- क्रिकेट न्यूजअसंभव! चेंडू दोन विकेटच्या मधून गेला तरी फलंदाज बाद झाला नाही, गोलंदाजाने डोक्याला हात लावला, Video
- उन्हाळ्यात वाढ होण्यापूर्वी खरेदी करा स्प्लिट एअर कंडिशनर 24,990 रुपयांपासून सुरुवात
- कोल्हापूरकायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला हे खरं पण कोणीही मोठ्या बापाचा असला तरी कारवाई करु: अजित पवार
- देशभाजपला तेराशे कोटींचा निधी; काँग्रेसला मिळालेल्या निधीच्या तुलनेत सुमारे आठपट अधिक
- क्रिकेट न्यूजधोनीने एका कृतीने जिंकली सर्वांची मनं, IPL 2024 पूर्वी जीवलग मित्राच्या मदतीला जागला…
- मुंबईAbhishek Ghosalkar Murder: घोसाळकर हत्या प्रकरणाला वेगळं वळण; ‘मला फसवलं जातंय’, नोरोन्हाच्या अंगरक्षकाचा धक्कादायक आरोप
- जळगावबारावीच्या परीक्षेत तीन वेळा अपयश; पडेल ते काम केलं, संघर्षावर मात करत तरुण बनला नौसेना टेक्निशियन
- करिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे? मग ‘बीसीए’ मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..
- आरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन
- सौंदर्यHighlighter For Hair :केसांना डॅमेज न करता मिळवा ट्रेंडी लुक्स, अनेक रंगांच्या शेडमध्ये उपलब्ध
- विज्ञान-तंत्रज्ञानगुलाब, चॉकलेट, टेडी वैगरे विसरा! फक्त १ हजारांत मिळत आहेत Redmi चे इअरबड्स, जाणून घ्या Valentine’s Day च्या ऑफर्स
- रिलेशनशिपऐश्वर्या रायसोबतच्या वादाच्या दरम्यान जया बच्चन म्हणाल्या “मला अशा घाणेरड्या लोकांचा तिरस्कार आहे…”